यशवंतनगरनजीक अपघात; महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:44 IST2019-03-22T00:43:27+5:302019-03-22T00:44:14+5:30
ताहाराबाद रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मायलेक दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.

यशवंतनगरनजीक अपघात; महिला ठार
सटाणा : ताहाराबाद रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मायलेक दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. २१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास येथील यशवंतनगर नजीक झाला.
देवळा तालुक्यातील कापसी येथील शिवाजी नामदेव साबळे (४५) व त्यांची आई सुमनबाई साबळे (६५) हे मायलेक दुचाकीने वीरगावकडे निघाले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुमनबाई यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर शिवाजी गंभीर जखमी झाले असून, त्यांना मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी सटाणा पोलिसांत इंडिका चालका विरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (२१सटाणा अॅक्सिडंट)