महिला नगरसेविकांना कामकाजाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:52 IST2018-11-29T00:52:23+5:302018-11-29T00:52:55+5:30
महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष कामकाजाचे तसेच महापालिकेतील हक्क आणि कर्तव्यांबाबत धडे देण्यात आले. बुधवारी (दि.२८) झालेल्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेच्या कामकाजासंदर्भातील प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना कामकाज सुलभ होईलच शिवाय प्रभागात त्यांच्या कामकाजाचा ठसा उठविण्यास मदत होईल, असे सांगितले.

महिला नगरसेविकांना कामकाजाचे धडे
नाशिक : महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष कामकाजाचे तसेच महापालिकेतील हक्क आणि कर्तव्यांबाबत धडे देण्यात आले. बुधवारी (दि.२८) झालेल्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेच्या कामकाजासंदर्भातील प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना कामकाज सुलभ होईलच शिवाय प्रभागात त्यांच्या कामकाजाचा ठसा उठविण्यास मदत होईल, असे सांगितले.
उंटवाडी रोडवरील द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागाचे विभागीय संचालक माधवराव शेजूळ व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कावेरी घुगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कावेरी घुगे यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत झालेले ज्ञान मनपात काम करताना उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. माधवराव शेजूळ यांनी प्रास्ताविक केले. तर प्रकल्प अंमलबजावणी, कर आकारणी महापालिका नीतिशास्त्र याविषयी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त नरेंद्र अष्टीकर यांनी मार्गदर्शन केले. राजकारणात व समाजकारणात महिलांचा सक्रि य सहभाग आणि जबाबदाऱ्या डॉ. स्नेहा पळनीटकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र माचे संयोजन महिला व बालकल्याण समितीच्या प्रेमलता कदम यांनी केले. आभार उपायुक्त समाजकल्याण हरिभाऊ फडोळ यांनी मानले.
मार्गदर्शन
यावेळी महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील सर्व कलमे व नगरसेवकांची भूमिका व जबाबदाºया सभाशास्त्राचे नियम आणि सभागृहातील कामकाज, हरकतींच्या मुद्यांवर निर्णय देणे, सभेत प्रश्न, उपप्रश्न विचारण्याच्या तरतुदी याविषयी औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी सचिव अॅड. एम. ए. पठाण, महानगरपालिकांचे अंदाजपत्रक व वित्तीय व्यवस्थापन, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे व प्रकल्प अंमलबजावणी याविषयी बृहन्मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्र. च. पिसोळकर यांनी मार्गदर्शन केले.