स्कार्पिओेने दुचाकीस धडक दिल्याने महिला ठार

By Admin | Updated: July 30, 2014 00:23 IST2014-07-29T23:06:58+5:302014-07-30T00:23:11+5:30

स्कार्पिओेने दुचाकीस धडक दिल्याने महिला ठार

Women killed by scorpion giving two-wheelers to death | स्कार्पिओेने दुचाकीस धडक दिल्याने महिला ठार

स्कार्पिओेने दुचाकीस धडक दिल्याने महिला ठार

नाशिकरोड : दत्तमंदिर सिग्नल- जवळील आनंद प्लाझासमोर मोटारसायकलवर जाणाऱ्या पती-पत्नीस पाठीमागून अज्ञात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील बोधलेनगर स्प्रिंग व्हॅली इमारतीत राहणारे मोहन आनंदा पाटील (वय ४५) व त्यांची पत्नी पुष्पलता मोहन पाटील (वय ४०) हे दोघे आज दुपारी ३ च्या सुमारास मोटारसायकलवरून घरून सिन्नरला मुलीकडे जाण्यास निघाले.
नाशिकरोड परिसरातील दत्तमंदिर सिग्नलजवळील आनंद प्लाझा इमारतीसमोर अज्ञात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने पाटील यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या जोेरदार धडकेत पुष्पलता मोहन पाटील या दुचाकीवरून खाली पडून यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women killed by scorpion giving two-wheelers to death