पर्स खेचताना खाली पडून महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 16:24 IST2018-12-11T16:23:33+5:302018-12-11T16:24:13+5:30
नाशिक : पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पर्स संशयितांनी खेचण्याच्या प्रयत्नात महिला दुचाकीवरून खाली पडून जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़९) सायंकाळच्या सुमारास ठक्कर बझार बस स्टॅण्डजवळ घडली़ पल्लवी विलास कुलकर्णी (४५, रा़ कृष्णदेव हौसिंग सोसायटी, टकले नगर, पंचवटी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विलास कुलकर्णी हे पत्नी पल्लवीसमवेत दुचाकीवरून ठक्कर बाजार बस स्टॅण्डसमोरून जात होते़ मारुती कुरीअरसमोरून जात असताना पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून (एमएच १५, १८२०) आलेल्या संशयिताने कुलकर्णी यांच्या गळ्यातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला़ मात्र, वेळीच प्रसंगावधान राखत त्यांनी पर्स वाचविली, यावेळी झालेल्या झटापटीत कुलकर्णी या दुचाकीवरून खाली पडल्याने किरकोळ जखमी झाल्या़ तर स्कुटीवरील संशयित पसार झाला़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.