शेतात ऊसतोड सुरु असताना ट्रॅक्टरखाली सापडून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:51 IST2021-05-29T16:51:11+5:302021-05-29T16:51:31+5:30
याप्रकरणी सदाशिव जगन राठोड (२०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक प्रताप भिला राठोड (रा.पारोळा, जि.जळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात ऊसतोड सुरु असताना ट्रॅक्टरखाली सापडून महिला ठार
नाशिक : येथील आडगावजवळील शिलापूरमध्ये एका शेतात ऊसतोड सुरु असताना ट्रॅक्टरचालकाने निष्काळजीपणे ट्रॅक्टर (एम.एच.४१ एएस६४२३) चालवून ट्रॅक्टर मागे आणताना ऊसतोड महिला मजुराला धडक दिली. ट्रॉलीच्या (जीजे३५ टी १९८२) चाकाखाली सापडून महिला मजुराचा जागीच मृत्यु झाला. मनिषा जगन राठोड (४५,रा.नांदुरगाव, मुळ सेवानगर उपखेड, ता. चाळीसगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सदाशिव जगन राठोड (२०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक प्रताप भिला राठोड (रा.पारोळा, जि.जळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांकडून चंदनवृक्षाची कत्तल
शास्त्रीनगर परिसरातील एका बंगल्याच्या आवारात वाढलेल्या चंदन वृक्षावर चोरट्यांकडून कुऱ्हाडीचा घाव घातला गेला आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधारातून चंदनाचा बुंधा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि 28) रोजी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास निखिल कुलकर्णी (३४, कुलप्रभा बंगला) यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरील तारेचे कुंपन कापून चोरांनी आत प्रवेश केला. दोन अनोळखी इसमांनी आवारातील चंदनाचे पंचवीस फूट उंचीच्या वृक्षाची कत्तल करत सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा सहा फुटांचा बुंधा चोरून नेल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे