शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत सापडला घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह; शेजारी पडलेल्या पर्सने समोर आणलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:57 IST

नाशिकमध्ये इमारतीच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती

Nashik Crime: नाशकात पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तपासानंतर एका घरकाम करणाऱ्या महिलेने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन स्वतःला संपवलं. पोटाच्या आजाराला कंटाळून महिलेने इमारतीच्या गच्चीवर जाऊन पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अश्विनी गणेश इंगोले असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटलं.

संत कबीरनगर येथील रहिवासी असलेल्या इंगोले या शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काळेनगरमधील सुयश अपार्टमेंटमध्ये घरकाम करण्यासाठी आल्या होत्या. काम आटोपून रात्री नऊ वाजता त्या तेथून निघाल्या पण अपार्टमेंटच्या बाहेर जाण्याऐवजी त्या गच्चीवर गेल्या. त्यानंतर पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या टाकीवर चढून त्यांनी आतमध्ये उडी मारल्याचे पोलिसांना सांगितले. पाण्यात बुडून अश्विनी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. 

अश्विनी या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांचे कुटुंबिय त्यांच्या मोबाईलवर फोन लावत होते. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरूवात केली पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर कुटुंबातील काही महिला अश्विनी जिथे काम करत होत्या त्या घराच्या गच्चीवर गेल्या. त्यावेळी त्यांनामोबाइल, पर्स, ओढणी, चप्पल सापडली. संशय आल्याने त्यांनी टाकीवर चढून पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. टाकीच्या पाण्यामध्ये अश्विनी यांचा मृतदेह तरंगत होता.  पोलिसांनी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह टाकीतून बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला.

गच्चीवर सापडलेल्या अश्विनी यांच्या पर्समध्ये आत्महत्येपूर्व  लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी, मी पोटाच्या आजारपणाला कंटाळून मी जीवाचे बरे-वाईट करत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, असं लिहीलं होतं. त्यावरुनच ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. 

दरम्यान, नातेवाईकांनी याप्रकरणी संबंधित घरमालकाकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी घरमालकाकडे रविवारी जाऊन चौकशी केली. अश्विनी यांच्या पर्समध्ये सापडलेली चिठ्ठी आणि घरमालकाचे हस्ताक्षरदेखील जुळवून बघितले. मात्र दोन्ही हस्ताक्षरे वेगवेगळी असल्याचे आढळली. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस