चापडगावी वीजेच्या धक्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:28 IST2020-10-21T22:29:01+5:302020-10-22T00:28:04+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागातील चापडगाव येथे शेतातील काम आटपून विहिरीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मनीषा माणिक दराडे या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

मनीषा दराडे
सायखेडा : गोदाकाठ भागातील चापडगाव येथे शेतातील काम आटपून विहिरीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मनीषा माणिक दराडे या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातील पिकाला खत टाकून घराजवळ असलेल्या विहिरीवर हातपाय धुण्यासाठी गेल्या असता विहिरीतील पंपाला वीज पुरवठा करणारी केबल विजेच्या खांबापासून विहिरीपर्यंत जमिनीवर पसरलेली होती. त्या केबलला कुठे तरी अचानक शॉर्टसर्किट झालेले असल्यामुळे तिथे केबलवरील आवरण निघालेले होत.े त्याठिकाणी अचानक मनीषा यांचा पाय पडला आणि त्यांना धक्का लागून मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात सासरे, सासू, पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायखेडा पोलीस स्टेशनंला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदशर्नाखाली सुरु आहे.