दोन मुलांसह विष घेत महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:36 IST2021-03-12T22:48:00+5:302021-03-13T00:36:40+5:30
सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटीतील एका महिलेने आपला १७ वर्षीय मुलगा व १२ वर्षीय मुलीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.

दोन मुलांसह विष घेत महिलेची आत्महत्या
नाशिक : सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटीतील एका महिलेने आपला १७ वर्षीय मुलगा व १२ वर्षीय मुलीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉलजवळील उषाकिरण सोसायटीत ही घटना घडली असून या घटनेत आईचा मृत्यू झाला असून दोघे बहीण, भावावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत सोनल सुहास शहा (वय ४३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तनुष सुहास शहा (वय १७) आणि रिया सुहास शहा (वय १२) असे उपचार घेणाऱ्या बहीण व भावाची नावे आहेत. ही घटना सुहास प्रमोदकुमार शहा यांच्या लक्षात येताच त्यांनी तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी तपासणी करत सोनल शहा यांना मृत घोषित केले, तर तनुष आणि रियावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.