शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

विजेच्या झटक्याने वायरमन मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:04 AM

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.

ठळक मुद्देढेकूची घटना : जातेगाव उपकेंद्रावर जमावाचा हल्ला

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.खांबावर चढलेला सोपान अकस्मात विजेच्या तारेला चिकटला आणि बघता बघता खाली फेकला गेला. उपचारासाठी त्याला नेण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याच्या वृत्ताने ढेकू गावात हलकल्लोळ उडाला. तरुण मयत सोपान चव्हाण (२५, रा. ढेकू) हा ह्यझिरो वायरमनह्ण होता. झिरो वायरमन ही अनधिकृत संकल्पना असून, ग्रामीण भागात विजेच्या खांबावर चढून काम करण्यासाठी अनेक वायरमन, स्थानिक तरुणांकडून अल्प आर्थिक मोबदल्यात काम करून घेत असतात. सध्या वीज वितरण कंपनीची वीजबिल वसुली मोहीम सुरू असून, मुख्य तारांमधील वीजप्रवाह बंद करून, बिलांच्या वसुलीसाठी दबाव आणला जातो असे म्हटले जाते. मयत सोपान हा नेमका दुरुस्तीसाठी चढला होता की कशासाठी याचा खुलासा होऊ शकलेला नाही.खांबावर चढताना ह्यपरमिटह्ण घेऊन वीज बंद केली जाते. चढलेली व्यक्ती सुरक्षित खाली उतरल्यावरच विजेचा प्रवाह सुरू केला जातो. प्रस्तुत घटनेत लाइनमन हरिश्चंद्र चव्हाण याने वीजप्रवाह बंद केल्याची खात्री करून वायरमन गणेश आहेर यांना कळविले व त्यानंतर सोपान खांबावर चढला होता, अशी माहिती मिळाली. अशावेळी त्याला विजेचा धक्का कसा बसला. यावर तर्कवितर्क सुरू असून, यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी जातेगाव येथे ग्रामस्थांनी तीन तास रस्त्यावर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता वाटपाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.अन‌् तणाव निवळलाया घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी सुचवलेली मध्यस्थी ग्रामस्थ व मयताचे नातेवाईक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी आमदार सुहास कांदे यांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला व सांयकाळी उशिरा मृतदेह नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोपानची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू