विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:55 IST2019-06-14T00:54:46+5:302019-06-14T00:55:08+5:30
सायखेडा येथील वीज वितरण अंतर्गत येणाऱ्या कार्यालयात काम करणारे वायरमन गणेश दगाजी पाटील यांचा काम करत असताना अचानक शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू
सायखेडा : येथील वीज वितरण अंतर्गत येणाऱ्या कार्यालयात काम करणारे वायरमन गणेश दगाजी पाटील यांचा काम करत असताना अचानक शॉक लागून जागीच मृत्यू झाला. सायखेडा परिसरात वादळी वाºयामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने दुरु स्तीचे काम सुरू असताना पिंपळगाव निपाणी, नायगाव शिवारात वायरमन गणेश पाटील आणि त्यांची टीम काम करत होती मुख्य वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, तरीदेखील कोणत्या तरी शेतकºयाने दुसºया रोहित्रावरून केबलच्या मार्फत वीजपुरवठा घेतला मात्र दोन्ही लाइन कुठे तरी एकत्र झाल्याने अचानक खांबावरील तारांमध्ये वीज आली. त्यामुळे खांबावर काम करत असलेले पाटील यांना शॉक लागला ते खाली पडले.