पेठ महाविद्यालयात हिवाळी शिबिर

By Admin | Updated: January 1, 2017 23:21 IST2017-01-01T23:20:54+5:302017-01-01T23:21:14+5:30

पेठ महाविद्यालयात हिवाळी शिबिर

Winter camp in peth college | पेठ महाविद्यालयात हिवाळी शिबिर

पेठ महाविद्यालयात हिवाळी शिबिर

पेठ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने डांग सेवा मंडळ नाशिक संचलित पेठ येथील दादासाहेब बीडकर महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर हरणगाव येथे संपन्न झाले. पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते.  कार्यक्र माधिकारी डी. डी. हळदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. दहा दिवसीय या शिबिरात स्वच्छता अभियान, श्रमदान, व्यायाम, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन आदि उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण व आदिवासी संस्कृती, चालीरिती, व्यवसाय अशा समाज जीवनाचा अभ्यास करण्यात आला. शिबिराचा समारोप डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष लताबाई बीडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तहसीलदार हरिश भामरे, डॉ. विजय बीडकर आदि उपस्थित होते. शिबिरादरम्यान विविध विषयांवर व्याख्यानमाला संपन्न झाली. पर्यावरण जागृती, प्लॅस्टिक मुक्ती, कॅशलेस व्यवहार आदि विषयांवर विद्यार्थ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती केली.
या प्रसंगी सरपंच मोहन जाधव, पोलीसपाटील निवृत्ती पवार, प्राचार्य सी. बी. सैंदाणे, प्रा. रवींद्र पगार, आर. एस. थोरवत, मगरे, ग्रामसेवक जाधव, प्रल्हाद गायकवाड, डी. डी. हळदे, एस. एन. शिंदे, श्रीमती पी. जी. शिरसाठ, विद्यार्थी प्रतिनिधी नितीन मानभाव, गीतांजली इंपाळ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)



 

Web Title: Winter camp in peth college