शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

वादळी वाऱ्याचा वेग १८ किमी प्रतीतास; 'तौक्ते'चा नाशकाच्या हवामानावर प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 3:29 PM

तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले.

ठळक मुद्देअधुनमधुन हलक्या सरी शहरात केवळ १.६मिमीपर्यंत पाऊस

नाशिक : शहर व परिसरात पहाटेपासूनच सोमवारी (दि.१७) वातावरणावर ह्यतौक्तेह्णचा प्रभाव झाल्याचे दिसुन आले. सकाळी वाऱ्याचा वेग ताशी आठ किलोमीटर इतका होता; मात्र साडेअकरा वाजेपासून वाऱ्याचा वेग ताशी १८ किमी इतका वाढला होता. वाऱ्याचा वेग अधिक वाढल्यामुळे नाशिककरदेखील घराबाहेर पडले नाही. यामुळे शहरात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता.तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले. शहराच्या वातावरणात सकाळी आर्द्रता ८१ टक्के इतकी मोजली गेली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात केवळ १.६मिमीपर्यंत पाऊस झाल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. दिवसभर पावसाच्या सरींचा वर्षाव जरी होत नसला तरीदेखील वाऱ्याचा वेग हा सरासरी १८ किमी प्रतीतास इतका होता. दिवसभरात वारे वेगाने वाहू लागल्यामुळे नागरिकांतही भीतीचे वातावरण पसरले होते. अतीउंचीवरील होर्डिंग्जदेखील वाऱ्याच्या वेगाने अक्षरक्ष: जमिनीच्या बाजूने झेपावले होते. तीन ते चार ठिकाणी दुपारपर्यंत झाडे पडल्याचे 'कॉल' अग्नीशमन दलाला प्राप्त झाले होते. ढगाळ हवामान आणि वेगाने वाहणारे वारे दिवसभर कायम होते.तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जाणार असल्यामुळे हवामान खात्याकडून नाशिकलादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर नाशकात जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती नियंत्रणासाठी आपत्कालीन कक्ष उभारण्यात आला होता. प्रशासनाकडून मनपा अग्नीशमन दल, जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन टीमला ॲलर्टवर ठेवण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत वादळी वाऱ्याचा वेग कायम होता.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळNashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान