वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 17:17 IST2019-11-05T16:57:36+5:302019-11-05T17:17:08+5:30
नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे.

वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात
नाशिक: नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा पाच नोव्हेंबर जन्मदिवस व पक्षीतज्ञ सलीम अली यांचा बारा नोव्हेंबर हा जन्म दिवस असल्याने यो दोन्ही व्यक्तींचा गोरव व्हावा व पक्षांचे संवर्धनासाठी हा सप्ताह आयोजित केला जात आहे.
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन्यजीव छायाचित्रकार आनंद बोरा यांच्या शंभर पक्षांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन निसर्गप्रेमी उप जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना डोईफोडे म्हणाले की, असे सप्ताह काळाची गरज बनले असून असे पक्षी सप्ताह विधायक व्हायला पाहिजे. या सप्ताहात शालेय मुलांना सहभागी करून त्यांना पक्षांची माहिती देखील दिली पाहिजे. प्रा.बोरा यांच्या शंभर विविध जातीच्या पक्षांची छायाचित्र पर्यटकांना आठवडाभर बघता येणार असून संस्थेतर्फेविविध शाळेमध्ये देखील ‘स्लाईड शो’ या निमित्ताने दाखविण्यात येणार आहे. याउदघाटन कार्यक्र मास उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, वन्यजीव छायाचित्रकार किशोर वडनेरे, वनपाल अशोक काळे, समितीचे अध्यक्ष अमोल दराडे, वनरक्षक चंद्रमणी तांबे,अश्विनी पाटील, अमोल दराडे, सागर बनकर, शंकर लोखंडे, आकाश जाधव आदी उपस्थित होते.