वाघाने कमळीचा मुका का घेतला?, छगन भुजबळांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:35 IST2019-03-05T04:34:58+5:302019-03-05T04:35:19+5:30

‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत,

Why did Tigers dumper the tigress, Chhagan Bhujbal's Shiv Sena split | वाघाने कमळीचा मुका का घेतला?, छगन भुजबळांचा शिवसेनेला टोला

वाघाने कमळीचा मुका का घेतला?, छगन भुजबळांचा शिवसेनेला टोला

नाशिक: ‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत, असा सवाल राष्टÑवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, देशाने आजवर अनेक लढाया लढल्या, त्याचा राजकीय अभिनिवेश कुणी दाखविला नाही, परंतु सैनिकांच्या मृत्यूचे व त्यांनी गाजविलेल्या शौर्याचे भांडवल भाजपा करीत आहे. पुलवामा घटनेच्या दिवशी मोदी व शहा राजकीय भाषणबाजीत गर्क असताना, राहुल गांधी यांनी संकटाच्या काळात आपला पक्ष सरकारसोबत असल्याची घोषणा केली, तर प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द करून आपल्या राजकीय परिक्वतेचे दर्शन घडविले.
विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका म्हणजे पाकची शरणागती व मोदींची मुत्सद्देगिरीचा डंका भाजपावाले पिटत आहेत. इमरान खान घाबरला, असे सांगितले जात आहे. जर इमरान खरोखरच तुम्हाला घाबरला असेल, तर गेल्या दोन वर्षांपासून पाकच्या कैदेत असलेला कुलभूषण जाधव का सुटत नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७१ मध्ये जिनिव्हा करारानुसार ९९ हजार पाकिस्तानी कैद्यांना पुन्हा पाकच्या हवाली केले होते याची आठवण भुजबळांनी करून दिली व या करारानुसारच अभिनंदनची सुटका झाल्याचे सांगून भाजपा फुकटचे श्रेय घेत असल्याची टीका केली.

Web Title: Why did Tigers dumper the tigress, Chhagan Bhujbal's Shiv Sena split