मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:12 IST2025-07-18T16:09:19+5:302025-07-18T16:12:04+5:30

मुंबईवरून नाशिकला निघालेल्या चार मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार उलटून डंपरवर जाऊन आदळली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघे होते. 

While driving from Mumbai to Nashik, the tire of the car burst at high speed, then...; Friend lost in a terrible accident | मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

अपघाताचे छायाचित्र प्रातिनिधीक आहे.

मुंबईकडून नाशिकच्या दिशेने चौघे मित्र समृद्धी महामार्गावरून बुधवारी मध्यरात्री परतीचा प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या कारचे (एम.एच१५ ईएक्स६६८८) अचानकपणे भीवंडीच्या पुढे टोलनाक्याजवळ टायर फुटले. यामुळे कार कोलांटउड्या घेत डंपरवर जाऊन धडकली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या भीषण अपघातात सिडकोमधील उत्तमनगर येथील युवक दुर्गेश गोविंद इंगळे (२५) हा युवक गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला. त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

सिडको परिसरातील उत्तमनगर येथील रहिवासी असलेल्या दुर्गेश व त्याचे तीन मित्र हे कारमधून समृद्धी महामार्गाने भिवंडीकडून नाशिकला येत होते. ओलांडल्यानंतर टोलनाक्याजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचे टायर फुटले. 

टायर फुटल्यामुळे कार उलटली अन् डंपरवर जाऊन भिवंडी आदळली. यामध्ये कारचालक दुर्गेशचा मृत्यू झाला. त्याचे तीन मित्र या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंगळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. उत्तमनगर परिसरात त्याच्या मृत्यूने शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: While driving from Mumbai to Nashik, the tire of the car burst at high speed, then...; Friend lost in a terrible accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.