वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:04 IST2025-12-03T12:02:05+5:302025-12-03T12:04:52+5:30
"साधुग्रामची ही जागा कित्येक वर्षापासून आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करतो. आपण जर २०१५ आणि २०१६ ची गुगल इमेज बघितली तर त्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत, २०१७-१८ ला महानगर पालिकेने एक प्रस्ताव घेतला. अतिक्रमण होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षारोपण केले पाहिजे, असा तो प्रस्ताव होता.

वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा कोट्यवधी भाविकांसाठी सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो, पण या भव्य आयोजनाची किंमत निसर्गाला मोजावी लागणार असल्याचं दिसतंय. कुंभमेळ्यासाठी नाशिकच्यातपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी तपोवनातील वृक्ष तोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. साधरणपणे वृक्षतोड टाळली पाहीजे याबद्दल कुणाचही दुमत असू शकत नाही. फक्त या मुद्द्यावरुन जे राजकारण केले जात आहे. ते राजकीयकरण करणे चुकीचे आहे असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
"साधुग्रामची ही जागा कित्येक वर्षापासून आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करतो. आपण जर २०१५ आणि २०१६ ची गुगल इमेज बघितली तर त्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत, २०१७-१८ ला महानगर पालिकेने एक प्रस्ताव घेतला. अतिक्रमण होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षारोपण केले पाहिजे, असा तो प्रस्ताव होता. आपलीही ५० कोटी वृक्षाची योजना सुरू होती. त्या अंतर्गत विचार न करता म्हणजे मी हे चूक आहे असं म्हणणार नाही, तिथे वृक्षारोपण केले आहे, म्हणून साहजिकच लोकांना वाटतंय आता ही झाडे का तोडता. पण महत्वाची अडचण ती वृक्ष तोडले नाही तर साधुग्राम कुठे करायचे ही अडचण आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"प्रयागराजचा जो कुंभमेळा होतो तो १५ हजार हेक्टरमध्ये होतो आणि आपल्याला ३५० एकरात करायचा आहे. तिथली जमीन जर मिळाली नाही तर कुंभमेळा कसा होईल, कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे, सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष, पर्यावरण यांना एक विशेष महत्व दिलेले आहे. नदीला एक विशेष महत्व आहे. आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत. एक प्रकारे कुंभमेळा करता आणि वृक्ष कसे तोडता हा समजही लोकांचा बरोबर आहे, त्यामुळे यातला मधला मार्ग काढावा लागणार आहे. जागा पण वापरता येईल पण जेवढे वृक्ष वाचवता येतील तेवढी वाचवता येतील. काही वृक्ष ट्रान्सप्लांट केली पाहिजे. मी प्रशासनाशी चर्चा केली, त्यांचही तेच मत आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.