शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

माणसांच्या चेहऱ्यांची माणसे गेली कुठे...

By admin | Updated: January 1, 2017 00:15 IST

गझलसंध्या : भीमराव पांचाळे यांची अर्थगर्भी मैफल

नाशिक : ‘माणसांची अचानक माकडे झाली कशी?, माणसांच्या चेहऱ्यांची माणसे गेली कुठे?’, ‘जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही’...यांसारख्या एकाहून एक सरस अर्थगर्भी गझल सादर करत भीमराव पांचाळे यांनी नाशिककरांना मनसोक्त रिझविले आणि सोबत सुख-दु:खाच्या व्यवस्थापनाचा मंत्रही दिला.  गंगापूररोडवरील विश्वास लॉन्स याठिकाणी विश्वास बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची संकल्पना आणि ग्रंथमित्र विनायक रानडे यांचे संयोजन या समन्वयातून विश्वास ग्रुपच्या वतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा’ या गझलेने मैफलीची सुरुवात केली. आशयघन गझलांबरोबरच काही शेरही पांचाळे यांनी ऐकवत मैफलीत रंग भरले. ‘तोडाल वृक्ष जेव्हा, ध्यानात हे असूद्या, कित्येक पाखरांचा तो आसरा असावा’ या पर्यावरणावरील शेरबरोबरच ‘माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली’ या पंक्तीलाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अमरावतीच्या नितीन देशमुख यांची ‘जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही’ या गझलेलाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन येता आले असते’, ‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे’, ‘जावो शिसेका बदन लेके किदर जावो’,‘मज नको गगन’ ‘जीवनाला दान घ्यावे लागते’, ‘हा असा चंद्र अशी रात’, आणि ‘गरिबाच्या लग्नाला नवरी’ या एकापेक्षा एक सरस गझलांनी मैफल सजत व सुगंधित होत गेली. पांचाळे यांना संगीतसाथ गिरीश पाठक (तबला), जगदीश मोरली (हार्मोनियम), अब्रार अहमद (संतूर), इक्बाल वारसी (व्हायोलिन) यांनी केली. मैफलीचे निवेदन दत्ता बाळसराफ यांनी केले. (प्रतिनिधी)