शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:46 IST

सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.

नाशिक : सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.  शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपाची असलेली ओळख केव्हाच लयास गेली आहे. कॉँग्रेस आणि अन्य पक्षांशी लढता लढता त्यांचे गुण तर पक्षात आलेच; शिवाय त्याच पक्षातील नेतेही आता पक्षात आल्याने ओरिजनल भाजपाई शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत तर चार सदस्यीय प्रभागात दोन ओरिजनल आणि दोन नवे परपक्षीय असे धोरणच म्हणे भाजपाने राबवून राजकारणात आदर्श समतोलाचे उदाहरण दाखवले होते. त्याचवेळी वादांच्या ठिणग्या उडत होत्या. परंतु आता त्या ठिणग्यांनी पक्षालाच आग लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपातील तीन आमदारांचे एक एकात नाही. तिघा आमदारांची त्रिमूर्ती स्थिती झालेली. त्यात एका अपक्ष आमदाराची पक्षात भर पडली. आधीच मूळ नेत्यांमध्ये वर्चस्ववाद त्यात अन्य पक्षांतील आजी- माजी आमदार नेते आणि त्यांच्या समर्थकांची भर पडली. त्यामुळे काय होणार, ज्यांनी मार्गदर्शन करावे किंवा ज्यांचा धाक होता असे नेते पक्षात नाहीत किंवा हयातही नाहीत, तर काही मार्गदर्शक मंडळावरील सदस्यांप्रमाणे मखरात बसवलेले आहेत. साहजिक गेल्या दोन ते तीन वर्षांत जे काही सुप्त संघर्ष होते तेच आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या हाती स्थानिक आणि महापालिकेची सत्ता एकवटल्यानंतर अन्य नाराजांना पक्षश्रेष्ठींचा आधार शोधावा लागला. स्थानिक पातळीवर एक निर्णय घेतला की राज्यस्तरावरून त्याला स्थगित करायचे या वादामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील डझनभर समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. बळी तो कान पिळी या उक्तीनुसार विशेष कार्य अधिकाºयासारखी पदे एकाच नेत्याच्या आणि आमदारांच्या घरातही दिली गेली, पण कार्यकर्त्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यात गटबाजीचे सध्या दिसत असलेले दर्शन बघून भाजपा कार्यालयात पहिले राष्टÑ.. अंत स्वयं... ही घोषणा खुंटीलाच टांगल्याचा प्रत्यय येतो आहे.  एका पक्षातील वादाची कारणे तरी किती? जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरावे अशा एका कल्याणकारी महिला रुग्णालयाचे स्थान कोणते असावे यासाठी दोन आमदारांमध्ये जो प्रतिष्ठेचा प्रश्न सुरू आहे त्यातून सर्वसामान्यांची परवड होत आहे त्याचे काय, याचा विचारही कोणी करताना दिसत नाही.मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मतास टाकावा लागतो आणि त्यांनी निकाल दिल्यानंतरही विरोध होत असेल तर मग पक्षाचे स्थानिक नेते ऐकणार तरी कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांवर विधानसभा निवडणुका आल्या असून, त्यासाठी आताच रणशिंग फुंकले जाण्याची चिन्हे असली तरी ही निवडणूक लढविणार तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवावी असे समर्पित कार्यकर्ते केव्हाच अंतर्धान पावले आहेत.