शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

घोटी येथील टोल बंद होताच रस्त्याला ग्रहण

By admin | Updated: October 23, 2015 22:06 IST

घोटी येथील टोल बंद होताच रस्त्याला ग्रहण

घोटी : घोटी-सिन्नर रस्त्याची ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रस्ते विकास महामंडळाकडून निर्मिती झाल्यानंतर व टोल वसुली बंद झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे व देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याला घरघर लागली आहे. प्रचंड खड्डे, धूळ यामुळे रस्त्याची चाळण झाली असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे.घोटी-सिन्नर रस्त्यावर पथकर आकारणी करण्यात आली. टोलची मुदत संपुष्टात आल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नाक्याला विरोध होऊ लागल्याने टोल वसुली थांबविण्यात आली. टोल बंद झाल्याबरोबर रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाने पाठ फिरविल्याने या रस्त्याची वाताहत झाली. रस्त्यावर घोटी शहरापासून सिन्नरपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची चाळण झाली असल्याने रस्त्यावर धुळीच्या प्रमाणात वाढ झाल्याने आजाराला निमंत्रण मिळत असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)