शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

नाशिकला मेट्रोची गरजच काय? : सुलक्षणा महाजन

By संजय पाठक | Published: July 13, 2019 11:35 PM

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसध्याच्या सरकारला लागले मेट्रोचे वेडमहापालिका कर्जबाजारी होणार

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.महाजन या मुळच्या नाशिककर असून सध्या त्या पुण्यात असतात. त्यामुळे नाशिकची चांगलीच माहिती असल्याने त्यांनी व्यवहार्य आणि परखड मते मांडली.प्रश्न- नाशिक महापालिकेच्या वतीने बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुर असानाच मेट्रोचा प्रस्ताव आला आणि तो अमलात येण्याची शक्यता आहे.महाजन : नाशिक शहर मला चांगलेच माहिती आहे. शहर बस वाहतूक महापालिकेने चालवण्याचा प्रस्ताव खूप अगोदरच प्रासूनचा प्रस्ताव होता. मात्र राज्यात कोठेही शहर बस वाहतूक ही फायद्यात नाही. ठाणे, पुणे, मुंबईचा देखील हाच अनुभव आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने अनेकदा हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता महापालिकेने बस सेवा सुरू करायचे ठरवले असेल तर हरकत नाही. मात्र मेट्रो चालविण्याइतपत या शहराची गरज नाही.प्रश्न: मेट्रो सेवा अयोग्य का वाटते?महाजन: मेट्रोसाठी प्रवासी क्षमतेची मोठी गरज असते. सुमारे वीस हजार प्रवासी दर प्रवासी क्षमता मेट्रो रेल्वेसाठी असते. ती नाशिकची क्षमता नाही. परंतु त्यामुळे खांबावर चालवणारी मेट्रो बस हा पर्याय होऊ शकत नाही. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र आणि प्रवाशांची संख्या गरज या सर्व बाबीचा विचार मेट्रोत केला जातो. परंतु सध्याचे सरकार हे फक्त मेट्रोवर भर देणारे आहे. मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक अशा सर्वच ठिकाणी मेट्रोच करण्याचा आग्रह आहे. मेट्रो म्हंटले की त्यात कंस्ट्रक्शन खूप असते. १६०० कोटींचा प्रोजेक्ट असेल तर ९०० कोटी रूपये कंस्ट्रक्शनसाठी असतात. कदाचित यामुळेच मेट्रोला पुढे रेटले जात आहे. परंतु त्यातून काहीही साध्य होणार नाही. महापालिका कर्जबाजारी होईल त्यापलिकडे काहीच होणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMetroमेट्रोPublic Transportसार्वजनिक वाहतूक