नाशिकला मेट्रोची गरजच काय? : सुलक्षणा महाजन
By संजय पाठक | Updated: July 13, 2019 23:38 IST2019-07-13T23:35:41+5:302019-07-13T23:38:54+5:30
नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबवून उपयोग नाही, अशा प्रकारातून काहीही साध्य होत तर नाहीच परंतु महापालिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु सध्याच्या सरकारला मेट्रोचे वेड लागले आहे. नाशिकचा विचार केला तर मेट्रोची कोणतीही गरज नाही. सार्वजनिक बस व्यवस्था सक्षम केली आणि फारतर बीआरटीएस करून ती नियम आणि शिस्तीच्या चाकोरीत चालवली तरी खूप झाले असे मत प्रसिध्द नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले आहे.

महाजन या मुळच्या नाशिककर असून सध्या त्या पुण्यात असतात. त्यामुळे नाशिकची चांगलीच माहिती असल्याने त्यांनी व्यवहार्य आणि परखड मते मांडली.
प्रश्न- नाशिक महापालिकेच्या वतीने बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुर असानाच मेट्रोचा प्रस्ताव आला आणि तो अमलात येण्याची शक्यता आहे.
महाजन : नाशिक शहर मला चांगलेच माहिती आहे. शहर बस वाहतूक महापालिकेने चालवण्याचा प्रस्ताव खूप अगोदरच प्रासूनचा प्रस्ताव होता. मात्र राज्यात कोठेही शहर बस वाहतूक ही फायद्यात नाही. ठाणे, पुणे, मुंबईचा देखील हाच अनुभव आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने अनेकदा हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता महापालिकेने बस सेवा सुरू करायचे ठरवले असेल तर हरकत नाही. मात्र मेट्रो चालविण्याइतपत या शहराची गरज नाही.
प्रश्न: मेट्रो सेवा अयोग्य का वाटते?
महाजन: मेट्रोसाठी प्रवासी क्षमतेची मोठी गरज असते. सुमारे वीस हजार प्रवासी दर प्रवासी क्षमता मेट्रो रेल्वेसाठी असते. ती नाशिकची क्षमता नाही. परंतु त्यामुळे खांबावर चालवणारी मेट्रो बस हा पर्याय होऊ शकत नाही. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र आणि प्रवाशांची संख्या गरज या सर्व बाबीचा विचार मेट्रोत केला जातो. परंतु सध्याचे सरकार हे फक्त मेट्रोवर भर देणारे आहे. मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक अशा सर्वच ठिकाणी मेट्रोच करण्याचा आग्रह आहे. मेट्रो म्हंटले की त्यात कंस्ट्रक्शन खूप असते. १६०० कोटींचा प्रोजेक्ट असेल तर ९०० कोटी रूपये कंस्ट्रक्शनसाठी असतात. कदाचित यामुळेच मेट्रोला पुढे रेटले जात आहे. परंतु त्यातून काहीही साध्य होणार नाही. महापालिका कर्जबाजारी होईल त्यापलिकडे काहीच होणार नाही.