शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:38 IST

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीर भुजबळ आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

Sameer Bhujbal ( Marathi News ) : नांदगाव मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांना आव्हान देणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष समीर भुजबळ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ हे आपल्या बरोबर होते आणि बरोबरच राहतील, असे मत व्यक्त केले. त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

सुहास कांदे यांनी नांदगाव मतदार संघातून माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव केला, त्यानंतर त्यांना तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ हे निधी देत नसल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. दरम्यान, हा वाद नंतरच्या काळात कमी झाल्याचे दिसत असले तरी यंदाच्या निवडणुकीपूर्वी पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यामुळे आता वाद थांबतील, असे वाटत असतानाच समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातून आव्हान दिले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रवादीमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी शिंदे सेनेने मात्र ही राष्ट्रवादीची भूमिका समजूनच कृती केली.

भुजबळ यांच्या बंडखोरीवरून शिंदेसेनेने देखील मग देवळालीत राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार दिले होते. दरम्यान, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीर भुजबळ आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी  मुंबई नाका येथे महात्मा फुले स्मृतीदिनी छगन भुजबळ यांच्या समवेत अभिवादन करण्यासाठी समीर भुजबळदेखील होते. यावेळी छगन भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न केल्यावर त्यांनी भुजबळ यांनी ते आपल्यावरोबरच असल्याचे सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024