शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा निव्वळ योगायोग की?

By admin | Updated: November 4, 2014 00:26 IST

पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा निव्वळ योगायोग की?

नाशिक : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर व त्या अनुषंगाने नाशिकला पक्ष संघटना बळकट करण्यासाठी येणार असल्याचे राज ठाकरे यांनी आगाऊ घोषित करणे, पदाधिकारी दौऱ्याच्या तयारीला लागलेले असतानाच वसंत गिते यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा देणे व पूर्वसंध्येलाच ठाकरे यांचा नियोजित दौराही रद्द होणे या तिन्ही घटना निव्वळ योगायोग की दोघांनीही एकमेकांच्या समजुतीने घेतलेले निर्णय आहेत याविषयी मनसैनिक बुचकळ्यात पडले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसैनिकांचे मनोर्धेर्य खच्ची होऊ नये व पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर निघण्याची घोषणा चार दिवसांपूर्वीच केली असल्याने नाशकातील मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. ठाकरे तब्बल तीन दिवस नाशिक मुक्कामी थांबून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येऊन या दौऱ्याची तयारीही केली जात होती; परंतु रविवारी कन्येला झालेल्या किरकोळ अपघातामुळे ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा रद्द केल्याचे जाहीर केले व सोमवारी सकाळी वसंत गिते, सचिन ठाकरे यांनी पदांचे राजीनामे दिले. यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जात आहे. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्याच्या दिवशीच पदांचे राजीनामे देऊन दबावतंत्र वापरण्याचे व दौऱ्यात राजी-नाराजीचे नाट्य घडविण्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरविले होते की काय अशी शंका घेतली जात असून, कदाचित पक्षप्रमुख राज ठाकरे यांना याची कुणकुण अगोदरच लागल्यामुळे त्यांनीच स्वत:हून दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्यांच्या स्थानिक निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दौऱ्यावर निघणाऱ्या ठाकरे यांच्या झोळीत एकेकाळी तीन आमदार व चाळीस नगरसेवक देणाऱ्या नाशकातून पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन दौऱ्याला अपशकुन होऊ नये म्हणूनही ठाकरे यांनी दौरा लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)