सायखेडा : नववर्षाचे स्वागत पाश्चिमात्य संस्कृतीने करण्याऐवजी ऐतिहासिक विचारांची जोपासना करून करण्याचा नवा आदर्श गोदाकाठच्या छत्रपती युवा प्रतिष्ठानने निर्माण केला आहे. रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नववर्षाचे स्वागत केले. गडाच्या पहिल्या पायरीपासून ते किल्ल्यापर्यंत चा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. यात प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कागद जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. किल्ल्यावरील कुंपण व्यवस्थित करून झाडांना पाणी देण्यात आले. यावेळी सागर खालकर, आकाश खालकर, शुभम खालकर, रवि फड, अक्षय खेलूकर, वैभव अहेर, महेश पाटील, नितीन शेळके, बंडू जाधव, राजेंद्र बोराडे उपस्थित होते. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}