शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

जिल्ह्यात नववर्षाचे शोभायात्रांनी स्वागत

By admin | Updated: March 28, 2017 23:50 IST

नाशिक : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ,अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेने नववर्षाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

नाशिक : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीच्या ठेक्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घराघरांतून होणारी पुष्पवृष्टी अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेने नववर्षाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात सिन्नर, येवला, कळवण, पिंपळगाव बसवंत, पेठ व चांदवड येथे शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले़ यावेळी पारंपरिक वेशातील गोंधळी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, भजनी मंडळ, कोळी नृत्य, गरबा, आदिवासी नृत्य, घोडेस्वार मावळे, राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी आदिंच्या वेशभूषेतील तरुण-तरुणी, चित्ररथ, संबळ व पिपाणी पथक, डफ, हलगी, तुणतुणे, विविध शाळांची लेजीम व बॅण्डपथके यासोबतच शहरातील अनेक तरुण व महिला मंडळांनी पारंपरिक वेशभूषा करत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेच्या मार्गावर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या़  चांदवड मराठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी, गुढीपाडव्यानिमित्त रंगमहालापासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सशस्र संचलन केले. प्रारंभी संघचालक व भारतमातेचा रथ होता. संघाच्या कार्यकर्त्यांनी संघाची शपथ व प्रार्र्थना घेऊन सुरुवात केली. संचलन श्रीरामरोड, शिवाजी चौक, सोमवारपेठ, बाजार पटांगण येथून समारोप झाला. (लोकमत चमू)परंपरेची जपणूकहिंदू पंचांगातील नववर्षाच्या प्रभातकाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील विविध वेशभूषांनी परंपरेची जपणूक करण्याचा संदेश देतानाच महाराष्ट्रीयन मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेतील वासुदेव, गोंधळी हे दिसेनासे झाले असले तरी मिरवणुकीत त्यांचे दर्शन झाले. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थी चमूने सादर केलेल्या लेजीम नृत्य, ढोलकी, संबळ, सनई, टाळ, मृदंग या संगीतमय सुरावटीनी परंपरा टिकून राहिली असल्याचे मिरवणुकीतून दिसून आले. सिन्नरला शोभायात्रासिन्नर येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला व युवतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. मंजूळ स्वरांतील विविध पारंपरिक वाद्यांच्या सुरावटींनी नागरिक हरपून गेले होते. डिजिटलच्या जमान्यात अद्यापही आपले अस्तित्व टिकून असलेल्या पारंपरिक संबळ-पिपाणीच्या तालावर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरत नाचायला सुरुवात केली. महिलांनी फुगड्या खेळल्या. चित्ररथ, संबळ व पिपाणी पथक, डफ, हलगी, तुणतुणे, ढोल पथक, लेजीम पथकाने उत्साहाला भरते आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. आंबेगण शाळेने उभारली शैक्षणिक गुढीपेठ : आंबेगण येथील आश्रमशाळेत मराठी नववर्षाचे स्वागत शैक्षणिक गुढी उभारून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा संदेश देत करण्यात आला. शाळेच्या आवारात भव्य गुढी उभारण्यात आली. या शैक्षणिक गुढीवर बेटी बचाओ, बेटी पढाओ, पाणी वाचवा, पाणी जिरवा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया असे संदेश लावण्यात आले होते. स्त्रीभ्रूणहत्त्या ही समाजाला लागलेली कीड असून, त्यावर विद्यार्थ्यांकडून जनजागृती होणे आवश्यक असल्याने मराठी नववर्षाच्या निमित्ताने शैक्षणिक जनजागृती करण्यात आंबेगण आश्रमशाळेने घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. आर.आहिरे, उपशिक्षक पी.पी. महाले, एस.बी. कोळेकर, एच.एस. भामरे, एस. डी. चंद्रात्रे, ए.पी.तुसे, ए.के. सावंत, चिंचोरे, एल. एम. गायकवाड, भामरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.