शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

लाभतेय सोळा राज्यांच्या कलाकुसरीला दाद

By admin | Updated: July 31, 2016 00:35 IST

हस्तकला : ज्यूटच्या वस्तू, करवंटीची आभूषणे लक्षवेधी

 नाशिक : राजस्थानी कलाकुसर केलेल्या कठपुतळ्या अन् शोभेच्या आकर्षक वस्तू, बिहारची मधुबनी चित्रकला, हैदराबादची अस्सल मोतीकला, देवदारच्या फांद्यांपासून बनविलेले अरुणाचल प्रदेशच्या शोभेच्या वस्तूंसह तब्बल सोळा राज्यांमधील स्थानिक नावीन्यपूर्ण वस्तूंचा खजिना नाशिककरांपुढे खुला झाला आहे. निमित्त आहे आदिरंग महोत्सवाचे. महोत्सवांतर्गत तब्बल सोळा राज्यांच्या कलाकुसरीची नाशिककरांना यानिमित्ताने ओळख होत आहे. विविध राज्यांमधील आदिवासी लोककलेबरोबरच तेथील शृंगारिक वेशभूषा, कपडे, पादत्राणे, वाद्य आदि वस्तू नाशिककरांना यानिमित्ताने बघावयास मिळत आहे. नाशिककरांचा आदिरंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आदिवासी पाड्यांवर असलेल्या झोपड्यांच्या आकारात सभागृहाच्या बाहेर सुमारे २५ स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये देशाच्या विविध राज्यांची हस्तकला प्रदर्शित करण्यात आली असून, आसाम, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, बिहार, राजस्थान, हैदराबाद आदि राज्यांमधील पोशाख, शृंगार साहित्य, हस्तकलेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, अलंकार, पादत्राणे, शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरात अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच भरविण्यात आल्याने आबालवृद्धांची या ठिकाणी गर्दी लोटत आहे. दुपारनंतर प्रदर्शनाला नाशिककरांनी मोठ्या संख्येने भेट दिली. महोत्सवामध्ये हिमाचल प्रदेशची बराल टू, राजस्थानचे स्वांग नृत्यकला, मणिपूरचे पुंग चोलम, छत्तीसगडचे गौंड मारिया, गुजरातमधील राठवा, केरळची कावडी यांसह विविध राज्यांमधील नृत्यकलेच्या मेजवानीचा आस्वाद नागरिक घेत आहेत. सांस्कृतिक वारसा असलेल्या नाशिककरांना ‘आदिरंग’ने मोहिनी घातली आहे.