शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

...चिमुकल्यांनी दाखवला मार्ग

By admin | Updated: January 2, 2017 00:29 IST

येवला : शेतकऱ्यांनी अंगीकारावे व्यापारी धोरण

येवला : कष्टकरी शेतकऱ्यांनी व्यापारीवृत्ती जोपासावी आणि शेती करतानाच व्यापारी म्हणून काम करावे. उत्पादन खर्चावर आधारित भाव आपणच कसा पदरात पडून घ्यावा या उद्देशाचे निमगाव मढ येथील विद्यार्थ्यांनी शाळा आवारातच बाजार भरवून शेतकऱ्यांचे खरे नुकसान कोठे होते हे सप्रयोग सिद्ध करून दाखवले.
व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतमाल अत्यंत कमी किमतीत खरेदी करतात. त्याच मालाची किरकोळ पद्धतीने विक्री करु न दुप्पट - तिप्पट नफा मिळवतात. शेतकरी राब राब राबतो. त्याला उत्पादन खर्च सुटण्याइतपतही पैसा हाती लागत नाही. हीच पद्धत आपल्या कष्टकरी पालकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी निमगाव मढ येथील विद्यार्थ्यांनी शाळा आवारातच बाजार भरवला. अन् आपले खरे नुकसान कोठे होते हे त्यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखवले.
या उपक्रमात निमगाव मढ जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चहा, वडापाव आदिंचे स्टॉल उभारले होते. यासाठी इंधनाची अडचण दूर करण्यासाठी शाळेच्या परिसरामध्ये असलेला पाला-पाचोळा, काड्या-कचरा गोळा करून चूल तयार करून त्या चुलीवर चहा व वडा पाव बनवले. यात लहान मुलांची कृती पाहून शिक्षकांसह पालकांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता. सुट्या पैशांची वानवा असतानादेखील बाजारामध्ये समाधानकारक विक्री झाली. काही विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची भूमिका साकारून इतर विद्यार्थ्यांनी विक्र ीसाठी आणलेला शेतमाल त्यांनी कमी भावत खरेदी करून जास्तीचा नफा कसा मिळविता हे दाखवून दिले.
बाजारामध्ये सरपंच मनीषा लभडे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता खळे, संजय केणे, हिराबाई लभडे, स्वप्नाली लभडे, राजेंद्र लभडे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाच्या कौतुकाची थाप दिली. या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांनीही कौतुक केले. यापुढे असेच उपक्रम राबवावे अशा सूचना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी शाळेच्या शिक्षकांना दिल्या.
या मेळाव्यात खाद्यपदार्थांसह भाजीपाला, कटलरी आदि जवळपास ५० ते ६० दुकानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खरेदी-विक्रीचा व्यवसाय करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत होता. यात त्याच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लभडे यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक राजेंद्र ठोंबरे, प्रतिभा चव्हाण, सविता शिरसाठ, रावसाहेब गुंजाळ, ज्योती निर्लेकर, मीना पवार, दादासाहेब वाघमोडे आदिंनी परिश्रम घेतले. शिक्षक व पालकांनी या बाजारात खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. (वार्ताहर)