शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला दररोज पाणीपुरवठा

By admin | Updated: July 30, 2014 00:23 IST

अंबोली धरण भरले : नगराध्यक्षांचे आदेश; पाऊस झाल्याने संकट टळले

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण पूर्णत: भरल्याने शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे ठरलेल्या वेळेत दररोज करण्याचे आदेश नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची होणारी गैरसोय टळली आहे. आतापर्यंत एकूण ४५६ मि.मी. पाऊस झाला आहे.त्र्यंबक शहरात असणाऱ्या अहिल्या धरणाचा व अंबोली येथील ल.पा. बंधाऱ्याच्या पाण्याचा शहरासाठी वापर करण्यात येत असतो. तथापि, अहिल्या धरणातील पाणी पाच आळी, गढई आदि अहिल्या धरणाजवळील वसाहतीसाठी होत असतो. कारण अंबोली धरणातील पाणी पाच आळीपर्यंत कमी दाबाने होत येते. अंबोलीचे पाणी सर्व शहरात वापरले जाते. साधारणत: मे-जूनमध्ये पाणी कमी झाल्याने अगोदरच दिवसाआड आणि त्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची पाळी नगरपालिकेवर आली होती. कदाचित तीन दिवसांआड पाणीपुरवठा होईल अशी शक्यता असतानाच वरुणराजा मेहेरबान झाला. धरणाच्या पाण्याची पूजा केल्यानंतर दोन दिवसांवरून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आणि गेल्या चार दिवसांपासूनच्या पावसाचे सातत्य टिकले आहे. त्यामुळे मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, असा अहवाल पाणीपुरवठा प्रमुख बाळ फसाळे यांनी दिला. यामुळे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी कार्यालयीन आदेश देऊन दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)