राजापूर परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:23 IST2018-11-16T22:57:24+5:302018-11-17T00:23:53+5:30

येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे व कूपनलिकेचे पाणी आटल्याने राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Water shortage in Rajapur area | राजापूर परिसरात पाणीटंचाई

राजापूर परिसरात पाणीटंचाई

ठळक मुद्देग्रामस्थ हैराण : टँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे व कूपनलिकेचे पाणी आटल्याने राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लवकरच राजापूर गावासाठी वडपाटी येथून पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. सध्या नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे पाणी आटल्याने राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून वर्षभरापासून राजापूर व वाड्या-वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे; परंतु वाड्या-वस्त्यांवरदेखील पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे. गावातील वनविभागाच्या हद्दीतील विहिरीत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या ठिकाणाहून ग्रामस्थ पाणी घेऊन जात आहे.
राजापूर गाव व वाड्या-वस्त्या या मोठ्या असल्याने एका टॅँकरच्या खेपेमध्ये गावची व वस्तीवर राहणाºया नागरिकांची तहान भागत नाही. या ठिकाणी बºयाच पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या; मात्र एकही योजना यशस्वी झाली नाही. या गावाला निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते आणि भरपूर पाऊस होत नाही. त्यामुळे नदी, नाले व बंधारे कोरडेठाक राहतात, त्यामुळे येथे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते.

Web Title: Water shortage in Rajapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.