शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रु ग्णालयात वर्षभर पाणी

By admin | Updated: June 12, 2016 00:28 IST

येवला : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने बोअरवेल

येवला : प्रत्येकाने आपल्या घर परिसरातील पाणी जमिनीत जिरविल्यास १२ महिने पाण्याचा तुटवडा भासणार नाही, या वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन घडविण्याचा प्रयत्न येवल्यातील ग्रामीण रुग्णालयात झाला आहे. पाऊस पडतो; पण पाणी अडवतं कोण? आणि जिरवण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई भासते.नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या या पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ करण्याची आवश्यकता नेहमीच व्यक्त होते; मात्र प्रत्यक्षात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रकल्प राबविण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. वर्षभर पाणी राहील, अशा पद्धतीने ग्रामीण रुग्णालयाच्या छतावरील पाणी एकत्रित केले आणि प्रकल्प साकारला अवघ्या चार दिवसात. येवल्यातील अद्ययावत अशा ३० खाटांच्या रुग्णालयात पाणीच नाही, अशा तक्रारी होत आहेत. पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून पाणी अडवाचा प्रस्ताव पुढे आला. रुग्णालयाच्या छतावर पावसाळ्यात पडणारे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून एकत्रित करून ते रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बोअरवेल शेजारीच आणून जिरवण्याची योजना तयार झाली. डॉ. किशोर पहिलवान यांची प्रेरणा आणि स्वखर्च करण्याची तयारी या पार्श्वभूमीवर, रुग्णालयातील कर्मचारी हिरामण गांगुर्डे, अशोक कांबळे, रूपेश पगारे, संगीता वानखेडे, मच्छिंद्र खैरनार, बाबासाहेब भड, जालिंदर निकम, सौ. साबळे, घनश्याम उंबरे यांच्यासह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉ. एस. डी. सदावर्ते, डॉ. नितीन जाधव, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. योगिता माळोदे, डॉ. शरद चव्हाण, डॉ.प्रवीण मेश्राम यांनीदेखील याकामी श्रमदान करून पाच बाय पाच बाय पाच आकाराचा खड्डा घेतला. पाइपच्या साहाय्याने छतावरचे सारे पाणी एकत्रित करण्याची व्यवस्था केली. खड्ड्यात खाली जाड रेती, विटाचे तुकडे भरले आणि मध्यभागी एक रांजण ठेवून त्यात पाण्याचा पाइप सोडला. प्रकल्प सिद्धीस गेला. आता वाट पावसाची आहे. यंदाच्या पावसाने मुळातच असलेली बोअरवेल पुनर्जीवित होणार आहे आणि ग्रामीण रुग्णालयाची कायमची पाणीटंचाई श्रमदानातून सिद्धीस जाणार आहे.