Water resources staff deprived of promotion | जलसंपदा कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
प्रहार संघटनेतर्फे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करताना जलसंपदाचे कर्मचारी.

ठळक मुद्देआदेशही दुर्लक्षित : तीन वर्षांपासून लढा सुरू

नाशिक : तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील ६० ते ७० चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना अजूनही पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करणाºया कर्मचाºयांना न्याय मिळत नसल्याने कर्मचाºयांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता ए. एल. पाठक यांना निवेदन दिले. या पदोन्नत्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांनी दिला आहे.
जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६० ते ७० चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना तृतीय श्रेणीत लिपिक, टंकलेखक म्हणून पदोन्नती मिळू शकलेली नाही. पदोन्नतीसाठी कर्मचाºयांनी जलसंपदा मंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘प्रहार’च्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता ए. एल. पाठक यांना निवेदन सादर केले. कर्मचाºयांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, शहरप्रमुख श्याम गोसावी, वैभव देशमुख यांच्यासह देवदत्त कटारे, शशिकांत मोरे, राहुल कानडे, नागेश पगारे, निरंजन सोनवणे, गणेश पवार, गजानन पाटील, यशपाल विभांडिक, निशिगंधा आमले, माया जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
नाशिकची उदासीनता
पदोन्नतीस पात्र असतानाही कर्मचाºयांची पदोन्नती नाकारणारा जलसंपदा विभाग अन्य जिल्ह्णाच्या तुलनेत मागे पडला आहे. औरंगाबाद, नागपूर, ठाणे, पुणे, अमरावती परिमंडळांनी जास्तीत जास्त पदे पदोन्नतीने भरली आहेत. आता केवळ नाशिक परिमंडळ असून सध्या कोणतीही प्रशासकीय अडचण नसल्याने पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Water resources staff deprived of promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.