शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी पिकांना देता येईना पाणी

By admin | Updated: September 3, 2016 23:47 IST

साकोरा : शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे

नांदगाव : तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर विहिरींना पाणी उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मात्र वीजपुरवठ्यातील अनियमितपणामुळे पाणी असूनही पिकांना देणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतपंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. तालुक्यातील जामदरी, नवे पांझण, मूळडोंगरी व साकोरा या गावांसाठी दोन वर्षांपूर्वी वीज उपकेंद्राला मान्यता मिळाली. या केंद्राच्या कुंपणासाठी केवळ भिंती उभारल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात उपकेंद्रासाठी मंजूर स्वतंत्र फीडर काही बसविले गेले नाही. श्रीनिवासन कंपनी या खासगी मक्तेदाराने याबाबत काम पूर्ण करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काम काही सुरू झाले नाही. त्यामुळे साकोरा भागातील शेतकऱ्यांना विजेसाठी नांदगावच्या फीडरवर अवलंबून राहावे लागते. सध्या पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना पाणी देण्याची गरज भासत आहे. एका बाजूला खंडित वीजपुरवठा, तर दुसऱ्या बाजूने मंजूर उपकेंद्र कार्यान्वित होत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, आबा इनामदार, साकोऱ्याचे उपसरपंच अतुल पाटील, देवदत्त सोनवणे, संजय सुरसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता रमेशचंद्र यांची भेट घेतली. साकोऱ्यासाठी मंजूर उपकेंद्र कार्यान्वित करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.