शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे खाटांच्या रुग्णालयाबरोबरच औषधांची प्रतीक्षा

By admin | Updated: April 20, 2015 00:21 IST

दोनशे खाटांच्या रुग्णालयाबरोबरच औषधांची प्रतीक्षा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे़ सिंहस्थातील पर्वणीकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने सुमारे १४ कोटींचा आराखडा तयार केला आहे़ या आराखड्यानुसार सकृतदर्शनी केवळ जिल्हा रुग्णालयातील इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्याचे पूर्णत्व व रुग्णालयातील अधिकच्या औषध साठ्याबाबत साशंकताच आहे़नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा पावसाळ्यात असल्याने या काळात साथीचे रोग मोठ्या प्रमाणात बळावतात़ त्यातच पर्वणीकाळात लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येतील, असा प्रशासनानेच अंदाज व्यक्त केला आहे़ भाविकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सिंहस्थाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयात दोनशे बेडच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे़ ५़३६ कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले असून, बाहेरून प्लास्टर सुरू आहे़या नवीन रुग्णालय इमारतीमध्ये सुसज्ज आॅपरेशन थिएटर, ओपीडी तसेच रुग्ण व स्टाफची संपूर्ण व्यवस्था असणार आहे़ तसेच या इमारतीचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्याचा व मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारत पूर्ण करण्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे़ मात्र, सद्यस्थितीत या इमारतीच्या टाईल्स, खिडक्या अशी किमान डझनभर कामे बाकी आहेत.त्यामुळे मे अखेरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे़ तसेच या इमारतीसाठी आवश्यक असलेले फर्निचर, लिफ्ट, वैद्यकीय उपकरणे, खाटा, प्रयोगशाळा साहित्य, किरकोळ साहित्य याबाबत काय? असाही प्रश्न समोर आला आहे़सिंहस्थासाठी आवश्यक असलेला औषधसाठा खरेदीबाबत वरिष्ठ पातळीवर अजून काही हालचाल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ त्यामुळे औषध खरेदीसाठीची निविदाप्रक्रिया, मंजुरी आदि प्रशासकीय बाबींमध्ये जिल्हा रुग्णालय व त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात वेळेत औषधे उपलब्ध होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे़(प्रतिनिधी)