शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वशिलेबाजी मुळे अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:26 IST

नाशिक- जीवनाचा शेवट तरी योग्य व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या छळवणूकीमूळे एका मृत व्यक्तीला चक्क अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे राहावे लागले. शहरात कोरोनामुळे मध्यंतरी अंत्यसंस्कारासाठी वेटींगचा प्रकार उघड झाला होता. मात्र, नंतर आता अंत्यसंस्कारासाठी वशिलेबाजी आणि दबाव सुरू झाला आहे. एका अधिका-याच्या नातेवाईकासाठी अमरधाममध्ये दिंडोरी येथील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला प्रतिक्षेत ठेवण्यात आले असून या प्रकरणी तक्रारीनंतर आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देनगरसेवकाने कर्मचा-यांची कानउघडणी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक- जीवनाचा शेवट तरी योग्य व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या छळवणूकीमूळे एका मृत व्यक्तीला चक्क अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे राहावे लागले. शहरात कोरोनामुळे मध्यंतरी अंत्यसंस्कारासाठी वेटींगचा प्रकार उघड झाला होता. मात्र, नंतर आता अंत्यसंस्कारासाठी वशिलेबाजी आणि दबाव सुरू झाला आहे. एका अधिका-याच्या नातेवाईकासाठी अमरधाममध्ये दिंडोरी येथील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला प्रतिक्षेत ठेवण्यात आले असून या प्रकरणी तक्रारीनंतर आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.सध्या कोरोनामुळे शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात शहराबाहेरील रूग्णांचा देखील समावेश असतो. जिल्हयातील ग्रामीण भागातून रूग्ण शहरात उपचारासाठी येत असतात. दिंडोरी येथील एका रूग्णाला आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे या वृध्द रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळष नातेवाईकांनी अमरधाममध्ये नोंदणी केली. मात्र, दिंडोरीतून नातेवाईक येण्यास विलंब झाल्याने ते विलंबाने अमरधाम मध्ये पोहोचले यावेळी सकाळची वेळ देऊन बुधवारी (दि.१६) विलंबाने आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला. महापालिकेच्या एका अधिका-याच्या नातेवाईकाचे निधन झाल्यानेत्यांच्यावर आधी अंत्यसंस्कार होतील असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईक खोळंबले. त्यांनी वारंवार विनंती करून देखील कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे एकाने स्थानिक नगरसेवकाडे तक्रार केली. या नगरसेवकाने कर्मचा-यांची कानउघडणी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका