शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून बसची प्रतीक्षा

By admin | Updated: September 28, 2016 23:56 IST

वडाळागाव : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजी

इंदिरानगर : सुमारे १५ वर्षांपासून वडाळागाववासीय बसच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्याप नागरिकांची गैरसोय दूर झालेली नाही. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था पुढाकार घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.वडाळागावात सुमारे दहा हजाराची लोकवस्ती आहे. यामध्ये नोकरदार, कामगार व रोजगारीवर उदरनिर्वाह करणाऱ्याची वस्ती मोठी आहे. गावामध्ये दोनच शाळा असून, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अपुरी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, महाविद्यालयही नाही. त्यामुळे गावातील शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी शहरात ये-जा करतात. तसेच शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक शहरात ये- जा करतात. परंतु सुमारे १५ वर्षांपासून बससेवा अद्याप सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे. विद्यार्थी वर्ग व नागरिकांना रिक्षाद्वारे ये-जा करावी लागत आहे. रिक्षामध्ये चालकाजवळ तीन ते चार आणि पाठीमागे सात ते आठ प्रवासी असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यातूनच लहान-मोठे अपघात झाले आहेत. हजारोच्या संख्येने लोकवस्ती आणि रस्ता असतानाही सुमारे वीस वर्षांपासून बससेवा का सुरू होत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. वडाळागाव ते शालिमार या पट्ट्यावर सुमारे ६0 ते ७0 रिक्षाचालक व्यवसाथ करीत आहेत. त्यांना प्रवासी मिळतात तर बसेसला प्रवासी का मिळणार नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवेअभावी आर्थिक आणि मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)