शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

वडाळागाव : ‘खाकी’वर सराईत गुंडाचा रात्री हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 2:24 PM

शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरूवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्दे‘बीट मार्शल’वरच चाल केल्याचा धक्कादायक प्रकार ‘खाकी’चा धाकच राहिला नाही

नाशिक : वडाळागाव परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून कायदासुव्यवस्थेला लावला जाणारा गालबोट दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्यांसह पोलिसांनाही त्याचा फटका बसू लागला आहे हे विशेष! मद्यप्राशन करुन मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शेकोटी पेटवून बसलेल्या सराईत गुन्हेगाराला हटकले म्हणून त्याने थेट ‘बीट मार्शल’वरच चाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाच्या इमारतींजवळ शंभरफूटी रस्त्यालगत शेकोटी पेटवून बसलेला सराईत गुन्हेगार फारुख सुभान शहा हा टोळक्यासह बसलेला बीट मार्शल संतोष जुंद्रे यांना आढळला. शहा सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात येताच जुंद्रे यांनी तत्काळ त्याला उठवून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरूवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली. जुंद्रे यांना ढकलल्याने ते जमिनीवर पडल्याने जखमी झाले. तसेच फारुखदेखील बेधुंद अवस्थेत असल्यामुळे तोदेखील खाली पडला अन् त्याला मार लागला. कनोजे यांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रावरुन इंदिरानगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत वाढीव बळाची मदत मागितली. मदत येताच पोलिसांनी दोघांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. जुंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार शहाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘खाकी’चा धाकच राहिला नाहीइंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी बघता ‘खाकी’चा धाकच राहिला नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. चार दिवसांपुर्वी जबरी लूट करुन व्यावसायिकाचा झालेला खून आणि त्यानंतर अशाप्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचा-यावर सराईत गुन्हेगाराकडून झालेला हल्ला या दोन्ही घटना गुन्हेगारांची मजल कुठपर्यंत पोहचली आहे व त्यांना खाकीचा धाक कितपत राहिला आहे, हे अधोरेखित करणाºया ठरतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी