शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

पंखे नसल्याने मतदान कर्मचाऱ्यांना चिंता

By admin | Updated: February 21, 2017 01:10 IST

निवडणूक : मतदान केंद्रांवर गैरसोयी असल्याने नाराजी

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत्वास आली असून, निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर आदल्या दिवशीच पोहचले आहेत. मतदान केंद्रांवर पोहचल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. शहरातील काही मतदान केंद्रांवर पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या ठिकाणी पंखेच नसल्याने मतदनाच्या दिवशी गैरसोय होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बल्ब लावण्यात आले असल्याचेही समजते.  महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात ६३९ इमारतींमध्ये १४०७ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ७७४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या-त्या विभागातील निवडणूक कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळपासूनच मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले तर मतदान केंद्रावर साहित्य व मनुष्यबळ पोहोचविण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचल्यानंतर काही ठिकाणी केंद्रांची स्वच्छता करण्यात आली नसल्याची बाब समोर आल्याचेही समजते. अर्थात याविषयी कर्मचारी उघडपणे बोलणे टाळत असले तरी नाराजी मात्र त्यांनी खासगीत व्यक्त केली.  शहरातील काही मतदान केंद्रांची पहाणी केली असता मतदान केंद्राची खोली लहान असल्याने अस्वच्छता, खुर्च्यांचा अभाव तसेच पुरेसा प्रकाश नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात फक्त बल्बची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पंख्याचा तर प्रश्नच नाही. मंगळवारी होणाऱ्या शहरातील बहुतांश पालिका शाळांमध्ये अशाप्रकारची परिस्थिती आहे. खासगी शाळेत केंद्र असलेल्या कर्मचाऱ्यांची कोणतीही तक्रार नसली तरी मनपा शाळा आणि गावठाणातील शाळांमधील मतदान केंद्रांमुळे कर्मचारी नाराज असल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या कोणत्याही वर्ग खोल्यांमध्ये पंखेच नसल्याने मतदान केंद्राची गैरसोय होणार असल्याचे बोलले जाते.  कर्मचाऱ्यांना केंद्र ताब्यात देताना त्याची स्वच्छता, वीजजोडणी, टेबल- खुर्च्या, पाण्याची व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून फारसे गांभिर्याने लक्ष केंद्रित न केल्याने असंख्य मतदान केंद्रांमध्ये अनेक अडचणी असल्याची चर्चा मतदान कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. काही खोल्या अत्यंत लहान आहे, मतदारांना जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा देण्यात आला आहे. त्यामुळे मतदान कक्षात गर्दी होऊन गोंधळ निर्माण होण्याचीही शक्यता आहे.  कारण मतदाराला मतदान करण्यासाठी किमान सात ते आठ मिनिटे लागू शकतात आणि कक्षात आतमध्ये येण्यासाठी घाई करण्याचीही शक्यता आहे. यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)