शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

एचपीटी महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान

By admin | Updated: September 26, 2016 01:35 IST

आवाहन : अर्ज स्वीकृती केंद्र स्थापन

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी महाविद्यालयात नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले. दरम्यान, महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे आवाहन केले.महापालिकेच्या वतीने विशेष मतदार नोंदणी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील २७ महाविद्यालयांमध्येही मतदार जागृती केली जात आहे. त्यानुसार एचपीटी व आरवायके महाविद्यालयांत अर्ज स्वीकृती केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, लोकशाहीत नागरिकांचा सहभाग आवश्यक असून, चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या लोकशाहीची सुरुवात करण्यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांची नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन केले. यावेळी मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनीही मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेला नमुना नं. ६ हा अर्ज कसा भरावा व त्यासाठी लागणारी कागदपत्रे, कार्यपद्धती यांची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून त्यांच्यामार्फत विद्यार्थी राहत असलेल्या २५ ठिकाणी जाऊन अर्ज जमा करण्यासाठी जागृती करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपप्राचार्य श्रीमती सिंग, मनपाचे सहायक आयुक्त एस. डी. ठाकरे, केंद्र प्रमुख कल्पना पाटील व नितीन पवार आदि उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वावळे यांनी केले. (प्रतिनिधी)