शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वडपाड्यात कुटुंबाला जातीबाहेर काढून मारहाण

By admin | Updated: March 22, 2015 23:29 IST

अभोणा पोलिसांचे दुर्लक्ष : पोलीस अधीक्षकांना निवेदन

नाशिक : किरकोळ वादावरून कळवण तालुक्यातील वडापाडा (सुकापूर) येथील एका दळवी कुटुंबाला शिवीगाळ-मारहाण करून जातीबाहेर व गावाबाहेर काढून दिल्याची घटना घडली असून, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे त्रासलेल्या या दळवी कुटुंबाने संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याबरोबरच समाजात परत घ्यावे यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन दिले आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, कळवण तालुक्यातील वडपाडा (सुकापूर) येथे ८ मार्चला तमाशा आला होता़ त्यामध्ये नाचणे व थट्टामस्करीतून ज्ञानेश्वर जिवला दळवी, रमेश गोविंदा दळवी व लक्ष्मीबाई गोविंदा दळवी यांचा संशयित लक्ष्मण रामा दळवी, पोपट किसन दळवी, योगेश सखाराम दळवी, यशवंत भिका दळवी, बाळू हिराजी वाघेरे, दिनकर सीताराम पवार, मणिराम खंडू पारधी यांच्याशी वाद झाला़ संशयितांनी दळवी कुटुंबीयांना मारहाण करून गावाबाहेर काढून दिले़ तसेच यापुढे गावातील कोणाचाही मृत्यू असो की लग्न समारंभ यामध्ये कोणी दिसल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यातयेत असे.या घटनेनंतर दोन दिवसांनी गावात साखरपुड्याच्या कार्यक्रमास या दळवी कुटुंबातील पाच वर्षांची मुलगी जेवणासाठी गेली असता तिला गावाबाहेर काढून देत या कुटुंबाची माणसे गावात आलीच कशी, अशी विचारणा करून लक्ष्मीबाई दळवीस मारहाण केली़ यानंतर त्यांच्या घरातील रमेश व ज्ञानेश्वरला घराबाहेर काढून मारहाणही केली़ या मारहाणीची दळवी कुटुुंबाने ११ मार्चला अभोणा पोलिसांत तक्रार अर्जही दिला; मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही़ पोलीस अधीक्षकांनीच लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती दळवी कुटुंबाने केली आहे़ (प्रतिनिधी)