निर्मळ बाणगंगेसाठी गाव कारभारी उतरले पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:34 PM2021-02-02T21:34:56+5:302021-02-03T00:16:07+5:30

कसबे सुकेणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावाचे कारभारी थेट गुढघाभर पाण्यात उतरले आणि इतर कर्मचारी व नागरिकांच्या बरोबरीने काम करत तब्बल दहा टन कचरा संकलित केला.

Village steward descended into the water for Nirmal Bangange | निर्मळ बाणगंगेसाठी गाव कारभारी उतरले पाण्यात

निर्मळ बाणगंगेसाठी गाव कारभारी उतरले पाण्यात

Next
ठळक मुद्दे‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत दहा टन कचरा संकलित

सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनंजय भंडारे, ग्रामसेवक रवी अहिरे, छगन जाधव, रमेश जाधव, बाळू कर्डक, सुहास भार्गवे, अतुल भंडारे, सोमनाथ भागवत ,छबु काळे , शिल्पा जाधव ,ज्योती भंडारे ,मनीषा भंडारे ,सविता जाधव, सुरेखा औसरकर , सरला धुळे ,आरती कर्डक, छाया गांगुर्डे, अबेदा सय्यद आदींसह माजी उपसरपंच किशोर कर्डक ,सुनील गोतरणे, विजय औसरकर ,जगन देवकर पिंटू कापसे ,ज्ञानेश्वर देवकर व ग्रामस्थ यांचा यात सहभाग होता.
निफाड तालुक्यामध्ये शासनाच्यावतीने प्रमुख पाच गावांमध्ये ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबवले जात असून तालुक्यातील कसबे सुकेणे या गावाची निवड झाली आहे. शासनाच्या निकषानुसार कसबे सुकेणे ग्रामपालिका हे अभियान यशस्वीरित्या राबवत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना अभियानची प्रतिज्ञा ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे यांनी दिली. याप्रसंगी उपसरपंच धनराज भंडारे यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने आपल्या गावाची स्वच्छता राखावी व हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले.

Web Title: Village steward descended into the water for Nirmal Bangange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.