शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:49 PM

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रामसेवक सुमित्रा पुंजाराम गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देटोकडे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार : कारवाईसाठी ग्रामस्थ ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रामसेवक सुमित्रा पुंजाराम गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.या संदर्भात ग्रामपंचायतीतील नागरिकांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. तथापि, शासकीय पातळीवर वेळकाढूपणा केला जात असल्याने जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेऊन गावकऱ्यांनी १४ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. टोकडे ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात चौदावा वित्त आयोगाचा मिळालेला निधी तसेच आमदारांच्या विकासकामांच्या निधीतून कामे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात जागेवर एकही काम अस्तित्वात दिसत नसल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने भगतसिंह सभा मंडप, संगणक कक्ष, चौक सुशोभीकरणाचे एकही काम झालेले नसताना लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावात ३२६ शौचालये बांधून ३९ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविले जात असताना त्यापैकी फक्त ५० शौचालयांचा वापर सुरू असून, बºयाच शौचालयांना टाक्या नाहीत, काहींना दरवाजे व भांडेदेखील बसविण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील व्यक्तींना दोन दोन घरकुले वाटप करण्यात आले असून, गावात करण्यात पाइपलाइनमध्येदेखील गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून, अपहाराची रक्कम वसूल करेपर्यंत उपोषण करण्यावर ग्रामस्थ ठाम असल्याचे विठोबा द्यानधान, वसंत शेजवळ, विजयसिंग डिंगर, नितीन सूमराव, जव्हारसिंग संगेडा, हेमंत फरस, नितीन डिंगर, सोपान सुमराव, भगवान रंगी यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपजिल्हा परिषदेने या तक्रारींची दखल घेत मालेगावचे उपअभियंता व मालेगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले होते, परंतु चौकशी करणारे अधिकारीदेखील जिल्हा परिषदेचे असल्यामुळे ते दोषींना वाचवित असल्याचा आरोप करून त्रयस्थ समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तत्पूर्वी जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ग्रामसेवक सुमित्रा गायकवाड या दोषी आढळल्याने बुधवारी गट विकास अधिकाºयांनी त्यांना निलंबित केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारी