Video : नाशिकमधील घनकर गल्लीतील वैश्य वाडा पत्त्याच्या इमल्याप्रमाणे अचानक कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 20:04 IST2021-07-03T20:02:10+5:302021-07-03T20:04:18+5:30
अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात मिळालं यश. जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल.

Video : नाशिकमधील घनकर गल्लीतील वैश्य वाडा पत्त्याच्या इमल्याप्रमाणे अचानक कोसळला
ठळक मुद्देअडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात मिळालं यश. जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल.
नाशिक : घनकर गल्ली येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वैश्य वाडा अचानक पत्त्याच्या इमल्याप्रमाणे खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या.
Video : नाशिकमधील घनकर गल्लीतील वैश्य वाडा पत्त्याच्या इमल्याप्रमाणे अचानक कोसळला
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2021
नाशिक : घनकर गल्ली येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वैश्य वाडा अचानक पत्त्याच्या इमल्याप्रमाणे खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.#nashikpic.twitter.com/yIZQ25y6TL
या घटनेची माहिती लक्षात घेता त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एक पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना बाहेर काढण्यास यश आलं आहे. या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याचे नूतनीकरण चे काम सुरू होते. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जखमींमध्ये संगीता अजित वैश्य (वय 55), रिता अभिषेक वैश्य (27) यांचा समावेश आहे.