शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:36 IST

देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

ठळक मुद्दे काँग्रेसचे 50 आमदारही निवडून येणार नाहीपालकमंत्री गिरिश महाजन यांचे भाकित नाशिकमध्ये भाजपा महिला मोर्चा कार्यकारणीला मार्गदर्शन

नाशिक - देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारणीच्या  समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. देशात 303 जागा मिळतील असे आम्हाला ही वाटले नव्हते, परंतु यावेळी केवळ लाट नव्हती, तर सुनामी होती, गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली. आता  राज्यातही  मुख्यमंत्री यांचीच हवा आहे. सरकारने पारदर्शक काम केले, अनेक प्रश्न चुटकी सरशी सम्पविले,  50 वर्षात निघाले नाही एवढे मोर्चे निघाले, मराठा आंदोलन सह अनेक मोर्चे निघाले, त्यासर्वांवर सरकारने तोडगा काढला. आरक्षणाविषयी  कोर्टाने निर्णय दिल्याने विरोधकांचे तोंड बंद झाल्याचेही महाजन म्हणाले,  विरोधकांवर टिका करताना त्यांनी काँग्रेसचे राज्यात 50 आमदाराही निवडून येणार नसल्याचे सांगितले. लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधातील जागा जिंकली.  मात्र बारामती मध्ये थोडे कमी पडलो असलो तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूद केले. माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुलांना पराभूत केले. अजित पवार, नारायण राणे यांच्या मुलांचा पराभव केला, तर  अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लोकसभेत  काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अभियाने यशस्वी झाले आहे.काँग्रेसची केवळ  एक जागा राज्यात आली.  नाही तर सम्पूर्ण राज्य  काँग्रेस मुक्त झाले असते. त्याचप्रमामे राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था बिकट असून काँग्रेसच्या तिन नेत्यांचे तोंड तीन दिशेला आहे. त्यांचा विरोधीपक्षनेताच आपल्याकडे आला असून  अडून अनेकजण येण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्ये राहायला कोणीही तयार नसून पक्षाध्यक्ष पद सांभाळण्यासही कोणीही समोर येत नसल्याची टिकाही गिरीश महाजन यांनी केली त्यांनी केली. 

परिश्रम केल्या शिवाय संधी नाहीभाजपाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पदाधिकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकांसाठी काम करताना जमिनीवर राहून काम करा. पक्षात परिश्रम केल्याशिवाय कोणालाही संधी मिळणाल नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाWomenमहिलाGirish Mahajanगिरीश महाजनcongressकाँग्रेस