Vehicles in possession of foreign liquor stock coming from Gujarat | गुजरातमार्गे येणाऱ्या विदेशी मद्य साठ्यासह वाहन ताब्यात

आयशर व्हॅनसह विदेशी मद्यसाठा जप्त .

ठळक मुद्देपंधरा दिवसात केलेली ही दुसरी कारवाई आहे.

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : गुजरात-दमण येथील विदेशी मद्याची जव्हार अंबोली मार्गाने चोरटी आयात वाढल्याने येथील अंबोली चेक पॉर्इंटवर वेगवेगळ्या वाहनातुन मोठ्या खुबीने दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाच्या तावडीत सापडली आहेत. नुकतीच अशी दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाने पकडली आहेत. सदर पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.
अंबोली स्थिर पथक प्रमुख विजय संधान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत आयशर व्हॅनसह विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.
यासंदर्भात स्थिर पथकाने केलेल्या कारवाई अनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे गुरुवारी (दि.१०) दुपारी १.४५ वाजतेच्या सुमारास मद्याने (लिकर) भरलेला आयशर कंपनीचा टेम्नो पोलिस पधकाने पकडला. दारु बंदी उत्पादन शुल्क विभागास कळविले असून गुन्हा दाखल करणेची कार्यवाही सुरू आहे.
या तपासणी मोहिमेत पोलिस वाहन ताब्यात घेत असताना चालक वाहन सोडून पसार झाला. पोलीस जमादार जाधव य्सहायक योगेश ठाकरे, आर. डी. पाटील जवान व प्रदीप झुंजरू यांनी ही कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ३० ते ३६ मद्यांच्या बायल्या असलेले किंमत ४ ते ५ लाख रु पयांचा साठा पकडण्याची कारवाई केली. पंधरा दिवसात केलेली ही दुसरी कारवाई आहे.
 

Web Title: Vehicles in possession of foreign liquor stock coming from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.