वाहनांची तोडफोड करणारी टोळी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:19+5:302021-06-24T04:12:19+5:30

गेल्या सोमवारी सायंकाळी पाच संशयितांनी गंगोत्री विहार येथे एकनाथ मोहिते यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. फिर्यादी ...

Vehicle vandalism gang arrested | वाहनांची तोडफोड करणारी टोळी ताब्यात

वाहनांची तोडफोड करणारी टोळी ताब्यात

Next

गेल्या सोमवारी सायंकाळी पाच संशयितांनी गंगोत्री विहार येथे एकनाथ मोहिते यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. फिर्यादी मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मोहिते यांच्या राहत्या घरासमोर राहुल डोलनार, कृष्णा बिडगर व त्यांचे साथीदार रिक्षातून क्रमांक (एमएच १५ एफ यू ७१४३) येऊन भांडणाची कुरापत काढून फिर्यादीचा मुलगा व सून यांना संशयित राहुल डोलनार व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करून मारहाण करून फिर्यादीच्या घरासमोर उभ्या असलेल्या आयशर व इर्टिंगा कार गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडून नुकसान करून पळून गेले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित आरोपी शुभ संतोष बनकर (रा. तारवालानगर), राहुल पोपट डोलनार, राहुल राजू मोहिते, सोनू ऊर्फ जावेद मुस्ताक शेख, शुभ्या ऊर्फ शकील अब्दुल सय्यद, सर्व रा. (वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी दिंडोरी रोड) यांना अटक केली. सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली एक काळ्या रंगाची ऑटोरिक्षा लाकडी दांडे, कुऱ्हाड जप्त करणात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय बिडगर करीत आहेत.

Web Title: Vehicle vandalism gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.