मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:25 IST2021-07-19T14:25:36+5:302021-07-19T14:25:45+5:30
नाशिक मनपाच्या पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड
नाशिक- मनसेने साथ न दिल्याने भाजपचा हिरमोड झाला असून पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या वत्सला खैरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बहुमत नसल्याने भाजप उमेदवार योगेश खैरे यांची मदार मनसेच्या नगरसेविका ऍड वैशाली भोसले यांच्या मतावर होती. मात्र, त्यांनी सहकार्य न केल्याने भाजप आमदार सीमा हिरे यांचे दिर असलेले नगरसेवक योगेश हिरे यांना माघार घ्यावी लागली.