शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

वशीकरण बाबाचा ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा, उचभ्रू महिला अडकल्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 18:59 IST

वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून नाशकातील पाच महिलांसह देश-विदेशातील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे

ठळक मुद्दे वशीकरणाचे भूलावा देऊन महिलांची फसवणूक खासगी समस्या निराकरणासाठी ऑनलाईन प्रसिद्धीमहिलांकडून उकळले टप्प्याटप्याने लाखो रुपये

नाशिक : वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून नाशकातील पाच महिलांसह देश-विदेशातील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तरुणाला नाशिकपोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे. वशीकरणाच्या माध्यमातून भोंदुगिरी करणाºया संशयिताने वेबसाईट आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विविध समस्यांनी पिडीत महिलांशी संवाद साधत त्यांना जाळ््यात ओढले व त्यांच्याकडून विविध आघोरी पुजांचे प्रकार सांगून अर्धनग्न अवस्थेतील फोटो व रक्कम आॅनलाइन मागवून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली.वशीकरणाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणारा संशयीत दिल्लीतील नीरज अशोक कुमार भार्गव (२३) असून त्याने वेगवेगळे नंबर आणि व्हाईस चेंजर अ‍ॅपच्या माध्यमातून पंडीत रुधर शर्मा, खान बाबा अजमेर आणि राधे मॉँ यांच्या आवाजात महिलाशी संवाद साधत नाशिकसह दिल्ली, न्यूझीलंड, कॅनडा, अशा आंतराराष्ट्रीय शहरांमधून उच्च शिक्षित महिलांना जाळ्यात ओढले. वेगवेगळ््या फोन नंबरवरून वेगवेगळ्या नावाने महिलांशी संपर्क साधत टप्प्याटप्याने त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा  उद्योग चालवला असताना नाशिकमधील एका महिलेने केलेल्या फिर्यादीच्या तपासात पोलिसाना पंडित रुधर शर्मा याच्या कृत्याचा सुगावा लागला होता.  या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे-पाटील यांनी सायबर क्राईम शाखेला तपासाच्या सूचना  केल्या. वशीकरण प्रकणरातील संशयित दिल्लीत राहून महिलांची फसवणूक करीत असल्याचे नशिक पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सापळा रचला. महिला पोलीस  शामल जोशी यांनी नीरज भार्गव याच्याशी संपर्क साधून त्यांना समस्या असल्याचा बनाव करीत त्याचा माग काढला . त्यानंतर नाशिकचे पथक दिल्लीला रवाना होऊन या पथकाने नीरज भार्गवचा माग काढून त्याच्या वशीकरण नाट्याचा पर्दाफार्श करण्यातच अखेर पोलिसांना यश आले. या कामगिरीत पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, उपनिरीक्षक रवींद्र्र देसले, संतोष काळे, राहुल जगझाप, मंगेस्वार काकूळदे, भूषण देशमुख यांच्या पथकाने संयुक्त कामगीरी करीत दिल्लीतून निरज भार्गव यास अटक केली असून त्याच्याकडून ३ मोबाइल फोन, ०२ डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

महिललांना असे ओढले जाळ्यात पोलिसांनी दिल्लीतून अटक केलेल्या संशयित आरोपी नीरज भार्गव याने वशीकरणबाबाच्या म्हणून पंडीत रुधर शर्मा याच्याविषयी आॅनलाईन दिलेल्या माहितीवरून नाशकातील एका महिलेने खासगी जीवनात वारंवार येणाºया समस्यांच्या निराकरणासाठी त्याचा शोध घेण्याचा केला असता तिला सिडकोतील पंडीतनगरमध्ये व्ही. एन. नाईक कॉलनीतील  पत्ता मिळाला. मात्र, या पत्त्यावर कुणीही राहत नसल्याने महिलेने त्यास दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर त्याने या महिलेकडून विविध पूजांची कारणे सांगून प्रथम साडेसात हजार रुपये, अर्धनग्न अवस्थेतील फोटो व बॉय फ्रेंडचे फोटो घेतले. तसेच वशीकरण साहित्यासाठी ४० हजार रुपये स्टेट बॅँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. महिलेनेही आॅनलाइन व्यवहार करीत या खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने पुन्हा महिलेशी संपर्क साधत वशीकरणासाठी खान बाबा अजमेर यांची मदत घेण्याचा सल्ला देत खान बाबाचा वेगळा फोननंबर दिला. यानंबरवही भार्गवनेच महिलेशी संपर्कसाधून २ लाख ४० हजार रुपये एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. अशाचप्रकार पुन्हा राधे माँच्या आवाजात संपर्क साधून थेट ६ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने एवढी रक्कम नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिल्याने भार्गवने तिला प्रियकरासोबतचे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत वशीकरणाच्या माध्यमातून प्रियकराला व आईवडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, अशाचप्रकारे भार्गवने जगभरातील तब्बल ४३ महिलाना वशीकरणाच्या जाळ््याच ओढले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलWomenमहिलाPoliceपोलिस