शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी मूर्ती विसर्जनाचा प्रयोग

By admin | Updated: September 4, 2016 00:44 IST

उपमहापौरांचा पुढाकार : अमोनियम बायकार्बोनेटचा वापर; नाशकातही राबविणार उपक्रम

नाशिक : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेमार्फत अमोनियम बायकार्बोनेटच्या माध्यमातून मूर्ती विसर्जनाचा राबविण्यात येणारा प्रयोग नाशिकमध्येही करण्यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पुढाकार घेतला असून, त्यासंबंधी त्यांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. संपूर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी महापालिकेचा अधिकारी पुणे येथे पाठविण्याची सूचना उपमहापौरांनी प्रशासनाला केली आहे. पीओपीच्या मूर्ती या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यासाठीच पीओपीच्या मूर्तींचा वापर न करण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी पीओपी ऐवजी पाण्यात लवकर विरघळणाऱ्या शाडूमातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहनही केले जात आहे. त्यासाठी अनेक शाळा-स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पीओपी मूर्तीपासून जलप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने अभिनव प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. घरोघरच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुणे महापालिका नागरिकांना सोडा अर्थात अमोनियम बायकार्बोनेट हा पदार्थ मोफत उपलब्ध करून देणार आहे. सदर पदार्थ पाण्यात टाकल्यास त्यात पीओपी मूर्ती काही तासांमध्ये विरघळते. पुणे महापालिका आणि कमिन्स इंडिया कंपनी यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या सहकार्याने हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही असा उपक्रम राबविता येईल काय, यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पुढाकार घेतला असून त्यासंबंधीचे पत्र आयुक्तांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)