सावित्रीबाई फुले यांचे कार्य अद्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:51 PM2020-01-03T22:51:01+5:302020-01-03T22:51:16+5:30

नाशिक : महात्मा फुले यांच्या सावलीत सावित्रीबार्इंचे कार्य दडपले गेले तरी विधवा महिलांनाही मातृत्वाचे मांगल्य मिळवून देणाऱ्या सावित्रीबार्इंसारखी दुसरी ...

Unique work of Savitribai Phule | सावित्रीबाई फुले यांचे कार्य अद्वितीय

सावित्रीबाई फुले यांचे कार्य अद्वितीय

Next
ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, महिला मुक्तिदिनानिमित्त कार्यक्र म

नाशिक : महात्मा फुले यांच्या सावलीत सावित्रीबार्इंचे कार्य दडपले गेले तरी विधवा महिलांनाही मातृत्वाचे मांगल्य मिळवून देणाऱ्या सावित्रीबार्इंसारखी दुसरी महिला जगाच्या पाठीवर कुठे दिसत नाही आणि पुढे दिसेल असेही काही वाटत नाही, त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे कार्य अद्वितीय आहे, असे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी (दि.३) हंप्राठा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयात केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्तिदिन, असा त्रिवेणी संगम साधणाºया कार्यक्र मात डॉ. सबनीस बोलत होते. सावित्रीबार्इंच्या या कर्तृत्वाला ‘महात्मा’ म्हटले पाहिजे, असेही सबनीस यांनी नमूद करत फुले दाम्पत्याच्या कार्याची महती विशद केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास कोणताही अडचण नाही, मात्र मराठी माणूस पेटून उठत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी मनोगतात मराठी भाषेचे दररोज संवर्धन करण्यावर जोर दिला. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. कौतिक लोखंडे यांनी केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे
मराठी भाषा आता सर्वांचीच मराठी भाषा ती विशिष्ट वर्गाची राहिलेली नाही. अनेक प्रवाहांची मराठी भाषा समृद्ध झाली आहे, असे सांगताना डॉ. सबनीस यांनी टिळक, आगरकर, फुले, आंबेडकर, कोल्हटकर अशा अनेकविध प्रवाहांनी मराठी भाषा समृद्ध झाल्याचे संदर्भ त्यांनी दिले. मराठी भाषेतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. दुभाषी, अनुवाद, कथा, नाट्य लेखन, पत्रकारिता, कला अशा संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Unique work of Savitribai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.