शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मालक-कामगारांत निर्माण झाले अनोखे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:23 IST

सातपूर (गोकुळ सोनवणे) : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यास आता दोन महिने होत असून, या काळात सर्वच कारखान्यांचे उत्पादन बंद आहेत. काही ठिकाणी कामगार कपात तर काही ठिकाणी वेतनकपात करण्यात येत आहे, अशा कालावधीत नाशिकमध्ये काही कारखान्यांत तर व्यवस्थापनाने कामगारांची काळजी घेतल्याने या संकटकाळात कामगार व्यवस्थापन यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. औद्योगिक क्षेत्र म्हटले की कामगार आणि व्यवस्थापन या दोन बाजू आल्याच.

सातपूर (गोकुळ सोनवणे) : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यास आता दोन महिने होत असून, या काळात सर्वच कारखान्यांचे उत्पादन बंद आहेत. काही ठिकाणी कामगार कपात तर काही ठिकाणी वेतनकपात करण्यात येत आहे, अशा कालावधीत नाशिकमध्ये काही कारखान्यांत तर व्यवस्थापनाने कामगारांची काळजी घेतल्याने या संकटकाळात कामगार व्यवस्थापन यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. औद्योगिक क्षेत्र म्हटले की कामगार आणि व्यवस्थापन या दोन बाजू आल्याच.काही ठिकाणी वेतनकपात तर काही ठिकाणी कामगार कपातीच्या चर्चा आहेत. मात्र, बहुतांश कंपन्यांमध्ये सुटीच्या काळात जरी कामगारांना वेतन दिले गेले आहे. नाशिकच्या बॉश कंपनीत तर संकटकाळातदेखील कामगारांना प्रती महिना दहा हजार रुपये वेतनवाढीचा करार झाला आहे. याशिवाय अनेक कारखान्यांत मालक म्हणजेच व्यवस्थापनाने कामगारांची खूपच काळजी घेतली आहे. कारखाने बंद असले तरी कामगारांशी संपर्क साधून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करू न घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या काळात कोणालाही काही अडचण आली तर संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. एवढेच काय काही कामगारांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला जात आहे. नाशिकच्या युनायटेड हिट ट्रान्सफर प्रा. लिमी. ही कंपनीदेखील अशाच प्रकारचे काम करीत असल्याने चर्चेत आली आहे. या कंपनीने कामगारांना नियमित वेतन तर दिलेच, परंतु लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचादेखील घरपोच पुरवठा केला आहे त्यामुळे अशाप्रकारच्या संकटकाळातील आधारामुळे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील हे नाते संकटकाळात अधिक घट्ट होताना दिसत आहे. हे नाते असेच टिकल्यास औद्योगिक क्षेत्रात कुठेही वादविवाद, संघर्ष दिसून येणार नाही.-------------लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कारखान्याचे संचालक विवेक पाटील यांनी एचआर विभागाच्या माध्यमातून आमचे दोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर आम्ही आमच्या अडचणी मांडतो. त्या अडचणी सोडविल्या जातात. दोन सहकाऱ्यांना किराणामालाची अडचण होती. त्यांना किराणा घरपोच देण्यात आला. कंपनीतर्फे १६७ कामगारांना फळे पोहोचविण्यात आले. दररोज आमचा आढावा घेतला जातो. काही कंत्राटी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह गॅस सिलिंडरची व्यवस्था मालकांनी करून दिली आहे.- सागर गडाख, कामगार, युनायटेड हिट ट्रान्स्फर, अंबड

टॅग्स :Nashikनाशिक